तो दिवस मी कसा विसरेल; दीपिकाने शेअर केला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव

लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण deepika padukone. उत्तम अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळे देखील चर्चेत येणारी दीपिका अनेकदा डिप्रेशन, नैराश्य यांसारख्या विषयावर सहजपणे व्यक्त झाली आहे. यामध्येच आता जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचं निमित्त साधत दीपिकाने तिच्या फर्स्ट पिरिअडचा अनुभव शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पीरिअड स्टोरीवर शेअर करण्यात आला आहे.’पीरियड स्टोरी’चा हा व्हिडीओ टेक ब्रँड Nua चा खास व्हिडिओ आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार, Nua चे संस्थापक आणि CEO रवी रामचंद्रन यांनी एका निवेदनातून जनतेला आवाहन केलं होतं. ज्यात ”अशा गोष्टी सांगा ज्यामुळे मुले वा मुली यांचा आपल्या पालकांशी संवाद वाढेल. ज्याविषयावर मुलं पालकांसोबत बोलू शकत नाही त्यावर ते बोलू शकतील. त्यांच्या या आवाहनानंतर दीपिकाचा हा खास व्हिडीओ समोर आला.

Please follow and like us: