TOD Marathi

पुणे : हवामान खात्याकडून पुणे शहरात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.परंतु त्या दिवशी अजिबात पाऊस पडला नाही. मात्र आता विसर्जनाच्या दोन दिवसा नंतर पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरासोबतच उपनगरातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान मागील दोन दिवस उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसू लागले होते. त्यानंतर पाचच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची गोंधळ उडाली. दरम्यान गणेशोत्सवात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी दहा दिवसात संततधार पाऊस सुरू होता. मात्र विसर्जन आणि त्यानंतरचा दुसरा दिवस पावसाने ब्रेक घेतला आजपासून पुन्हा पावसाची धामधूम सुरू झाली आहे.