राज्यातील Districts मधील निर्बंधाची माहिती आता एका Click वर मिळणार ; ‘आपत्ती’ विभागाकडून Website तयार

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जून 2021 –  राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात काही दिवसांपूर्वी लावलेले लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत. राज्य सरकारने यासाठी जिल्ह्यांच्या कोरोना परिस्थितीप्रमाणे त्यांची वर्गवारी केलीय. यानुसार प्रत्येक गटातील जिल्ह्यांत वेगळे निर्बंध आहेत. पण, आता याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

राज्यातील नागरिकांसाठी सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक वेबसाईट तयार केलीय. या वेबसाईटवर नागरिकांना कोरोनाबाबत राज्याने केलेल्या उपाययोजना, खबरदारीचे उपाय, राज्य तसेच स्थानिक प्रशासनाने लागू केलेले निर्बंध याची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. नागरिकांना ही माहिती https://msdmacov19.mahait.org/ या वेबसाईटला भेट दिल्यावर मिळणार आहे.

या साईटवर राज्यातील जिल्ह्यांची वर्गवारी दिली आहे. कोणत्या लेव्हलमध्ये कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोणते निर्बंध लावले आहेत?, याची माहिती या साईटवर उपलब्ध आहे. त्यासह राज्यातील ऑक्सिजन बेड्सची संख्या, आठवड्याभरातील ऑक्सिजनची स्थिती याबद्दलही माहिती मिळत आहे. त्यासह ही माहिती दर आठवड्याला अपडेट होत असते.

Please follow and like us: