Nirav Modi ला झटका; British Court ने फेटाळली मोदीची India प्रत्यार्पणाविरोधातील याचिका

टिओडी मराठी, लंडन, दि. 24 जून 2021 – ब्रिटनच्या न्यायालयाने आता पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातला फरार हिरा व्यापारी नीरव मोदीला झटका दिलाय. त्याची भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली असून कोणताही आधार या याचिकेला नाही, असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिलाय.

नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केलाय. याप्रकरणी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीविरोधात गुन्हे दाखल केलेत.

ब्रिटनच्या स्थानिक न्यायालयामध्ये न्या. सॅम्युएल गुझी यांच्यापुढे दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. भारतात सुरू असलेल्या खटल्यात नीरवला तिथे हजर राहावे लागेल, असे न्या. गुझी यांनी स्पष्ट केलं होत.

भारतीय न्यायालयामध्ये नीरव याच्या विरोधातील खटल्याची नि:पक्षपाती सुनावणी होणार नाही, हा दावाही ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला होता. तसेच नीरव याच्या वैद्यकीय गरजांची पूर्तता भारतामध्ये करण्यात येणार नाहीत, हा दावाही न्यायालयाने अमान्य केला होता.

या प्रकरणात प्रथमदर्शनी नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे दिसत आहेत, असे न्या. गुझी यांनी स्पष्ट केले होते.

ब्रिटन प्रत्यार्पण कायदा २००३ नुसार न्यायाधीशांनी निवड्याचा अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला होता. अखेर गृहमंत्री प्रीती पटेल यांनी प्रत्यार्पणास मंजुरी दिल्याचे ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरव मोदीला १३ मार्च २०१९ रोजी अटक केली आहे. तेव्हापासून तो वॉण्ड्स्वर्थ कारागृहामध्ये आहे.

Please follow and like us: