केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेत पद भरती ; 75 जागा रिक्त, असा करा अर्ज

टिओडी मराठी, दि. 19 जुलै 2021 – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेत अनेक जागा रिक्त असल्याने भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहकारी या पदासाठी हे भरती होणार आहे. या भरतीमध्ये सुमारे 75 जागा रिक्त आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 ऑगस्ट 2021 अशी आहे.

या पदांसाठी आहे भरती :
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
प्रकल्प सहकारी (Project Associate)

ही आहे शैक्षणिक पात्रता :

  • प्रकल्प सहाय्यक ( Project Assistant) – डिप्लोमा इन मायनिंग/ सायन्स/ इंजिनिअरिंग
  • प्रकल्प सहकारी (Project Associate) – डिग्री इन इंजिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग

असा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता :
सीएसआयआर-सीआयएमएफआर संशोधन केंद्र, 17 / सी, तेलेनखेडी क्षेत्र, सिव्हिल लाइन, नागपूर, महाराष्ट्र -440001.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : 13 ऑगस्ट 2021

Please follow and like us: