Mumbai सह उपनगरालाही मुसळधार पाऊस ; महापालिकेच्या Pay पार्किंगमध्ये साचलं 20 फूट पाणी, 350-400 वाहने पाण्याखाली

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 जुलै 2021 – शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. या पाण्यात शेकडो वाहने अडकले आहेत. कांदिवली भागातील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महापालिकेच्या अंडरग्राउंड पे पार्किंगमध्ये 20 फुटांपेक्षा वर पाणी साचले आहे. यात 350-400 वाहने बुडाले आहेत, असं समजत आहे.

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कांदिवलीमधील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये महापालिकेचे अंडरग्राउंट पे पार्किंग आहे.

यात 350-400 वाहने लावली होती. यात प्रामुख्याने कार आणि रिक्षांचा देखील समावेश आहे. या पार्किंगमध्ये रसत्यावरील पाणी साचल्यामुळे वाहनाचे नुकसान झालं आहे.

सध्या अग्निशमन दलाकडून पार्किंगमध्ये साचलेलं पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्यामुळे सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसलाय.

कोरोना काळात अनेकजण आपले रिक्षा याच पार्किंगमध्ये उभी करत होते. तसेच, काही महागड्या कारही इथे पार्क केल्या होत्या. या सर्व वाहने आता पाण्याखाली गेल्याने अधिक नुकसान झाले आहे.

Please follow and like us: