TOD Marathi

मुंबई: टी-20 विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून माजी खेळाडू राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेण्यास राहुल द्रविडने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेल्या दिर्घ संभाषणानंतर राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावर असताना राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती.

मुख्य प्रशिक्षकापेक्षा द्रविडची भूमिका मोठी असणार. ज्यामुळे त्यांचे मानधन जास्त असू शकते. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआयकडून साडेआठ कोटी मानधन देण्यात येते. मात्र, राहुल द्रविडला यापेक्षा अधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे.