TOD Marathi

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. (Radhakrishna Vikhe Patil in Kolhapur) काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? असा सवाल करत कधीकाळी कट्टर काँग्रेसी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil on Congress) थेट वार केला. राज्य अधोगतीला जात होतं, आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिलं आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिलं आहे. यावेळी त्यांनी वाळू माफियांवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, वाळू माफियांचा उन्माद ही राज्याला लागलेली कीड आहे, यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी 2024 मध्ये लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेतील त्या पद्धतीने काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.