TOD Marathi

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटपही झालं. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर रविंद्र चव्हाण यांना रायगड बंगला मिळाला आहे. (Bungalow Allotment) यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना नव्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं महसूल खातं आणि रॉयलस्टोन बंगलाही मिळाला आहे.

खाते वाटपानंतर सगळ्या मंत्र्यांचं लक्ष लागलं होतं ते बंगल्याच्या वाटपाकडे… कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांनी कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले हवेत, यासाठीच्या सूचना मागावल्या होत्या. यादरम्यान कॅबिनेटमध्ये आमदारांचे रुसवे फुगवेही बघायला मिळाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्र्यांनी कोणते बंगले हवेत, हे देखील संबंधितांना कळवलं. त्यानंतर आज मंत्र्यांचं बंगले वाटप जाहीर करण्यात आलंय.

अनेक बंगल्यांसाठी मंत्र्यांची रस्सीखेचही पाहायला मिळत होती. सेवासदन बंगल्यासाठी गिरीश महाजन आग्रही होते. कारण सागर बंगल्याला लागूनच सेवा सदन बंगला आहे. तो बंगला मिळावा, यासाठी महाजनांनी विशेष प्रयत्नही केले. अखेर त्यांना सेवासदन बंगला मिळाला आहे.

कुणाला कुठला बंगला?

चंद्रकांत पाटील-सिंहगड
गिरीश महाजन-सेवासदन
रविंद्र चव्हाण-रायगड
अतुल सावे-शिवगड
मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग
गुलाबराव पाटील-जेतवन
शंभुराद देसाई-पावनड
• संजय राठोड-शिवनेरी
सुधीर मुनगंटीवार-पर्णकुटी
विखे पाटील-रॉयलस्टोन
दीपक केसरकर-रामटेक
विजयकुमार गावित- चित्रकुट
राहुल नार्वेकर- शिवगिरी
सुरेश खाडे-ज्ञानेश्वरी
उदय सामंत- मुक्तागिरी
अब्दुल सत्तार-पन्हाळगड