TOD Marathi

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या थोड्या थोडक्या नव्हे तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत ते शिंदे गटात सामील झाले. (Uddhav Thackeray) एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात 22 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का? (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यावर आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीच उत्तर दिलं आहे. “साद घातली तर येऊ देत… मग बघू” असं शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray, wife of Raj Thackeray) यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केलं.

कोणताही पक्ष संपत नसतो, तुम्ही कोणताही पक्ष पाहा, तो पुन्हा लढत असतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात केली. पक्षाचे खालचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची आजही बाळासाहेबांवर निष्ठा आहे. असंही त्या म्हणाल्या.

कोरोना काळाबद्दलही शर्मिला ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यावेळी फक्त आरोग्य मंत्री टोपे बाहेर दिसायचे. लोकांना विविध सेवा देताना, सुविधा पुरवताना आमच्या पक्षातील काही पोरं यादरम्यान गेलीत, त्यामुळे ज्यांना आमचा पक्ष दिसत नाही त्याला आम्ही काहीच उपाय करू शकत नाही. पक्ष तेव्हाही होता आणि आताही असल्याचं त्यांनी सांगितलं.