TOD Marathi

टिओडी मराठी, बंगळुरू, दि. 26 जुलै 2021 – कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पदाचा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत, अशी माहिती येडियुरप्पांनी दिली आहे. याचा फटका भाजपला बसणार आहे. येडियुरप्पा यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे लागले आहेत. दिल्लीमध्ये एक बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असे समजते.

कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार आहे, असे सांगितले आहे.

मागील अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नाही, असे येडियुरप्पांनी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केलीय.

2008 साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. तीन वर्षांत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्होट बँकेचं मोठं नुकसान झालं. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदींनी त्यांना परत पक्षात आणलं होतं.