TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोरच्यांना बोलण्याऐवजी आपल्या पक्षातील लोकांना शिकवावे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी ही सरकार चालवण्यासाठी तयार झाली नाही. आघाडी तयार झालीय ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी. प्रत्येकजण सरदार असल्यासारखं वागतोय.

जर सत्तेचे लचके तोडता आलं नाही तर एकमेकांचे लचके तोडा. मुख्यमंत्री काय बोलले? यावर काही बोलणार नाही. समोरच्यांना बोलण्याऐवजी आपल्या पक्षातील लोकांना शिकवावे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी बोलताना फडणवीस म्हणाले, ईडीने लूकआऊट नोटीस जारी केल्याचे मला आताच कळाले. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी चौकशीला सामोरं जावं हेच योग्य होईल. उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयात याबाबत धाव घेऊन झालीय.