TOD Marathi

भाजप – मनसे एकत्र येणार ?; Raj Thackeray यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेमुळे होत नव्हती युती, ‘त्या’ Clips Chandrakant Patil यांच्याकडे पोहचल्या

टिओडी मराठी, पुणे, दि. 26 जुलै 2021 – शिवसेनेनं भाजपची साथ सोडली त्यामुळे आता भाजपने मनसेकडे मोर्चा वळविला आहे. असे समजत आहे. भाजप आणि मनसे एकत्र येणार आहेत, अशी राजकीय चर्चा होत आहेत. गेल्या बराच काळापासून चर्चेत असलेली भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येणार आहे, असं दिसतंय. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे?, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते.

त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीमध्ये भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झालाय. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे बोलले जात आहे.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात नाशिक येथे भेट झाली. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना सांगितली होती.

राज ठाकरे यांनी मला सांगितलं की, त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झालाय. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो. तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केल्यावर ते हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असे मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस?, आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे.

मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट नाही झाली. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज भेट झाली. तासभर भेटलं पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं होतं.