TOD Marathi

टीओडी मराठी, चंदगड, दि. 13 मे 2021 – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथल्या पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी आपल्याच ठाण्यातील एका अंमलदारावर मास्क न वापरल्याचा कारणावरून कारवाई केलीय. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केलाय. पोलिसांनी स्वतः नियम पाळून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी म्हंटलं आहे.त्यांच्या या कामाबद्दल कौतुक होत आहे.

चंदगड इथल्या येथील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी आणि दोन होमगार्ड कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यांचे अहवाल प्राप्त होता पोलीस निरीक्षक तळेकर यांनी संपूर्ण पोलिस ठाण्याची स्वच्छता करून सँनीटायझींग केले आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि सँनीटायजरचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.

प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याबरोबर शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशी सूचना देखील केली आहे. त्यानंतर काही वेळात ठाण्यातील एक अंमलदार एका नगरसेवकांशी बोलताना त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी अंमलदारांनी मास्क घातला नव्हता, हे दिसले.

पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्या अंमलदारावर दंडात्मक कारवाई केली. नियमानुसार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. नियम राबविणाऱ्यांनी स्वतः नियमांचे पालन करायला हवे, असा हा धडा त्यांनी घालून दिलाय. त्यांच्या या कामाबद्दल कौतुक होत आहे.