कोरोनामुक्तीसाठी प्रभावी ठरू शकते एसडब्ल्यू थेरपी;! बार्शीच्या संशोधकाने शोधली नवीन थेरपी

टिओडी मराठी, बार्शी, दि. 13 मे 2021 – सध्या कोरोना हा आजार कसा बरा करायचा याची एक ठोस पद्धत नाही. मात्र, एसडब्ल्यू थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येईल. तसेच इतर सहवेदनांमुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रताही कमी होऊन त्यातून रुग्णांची मुक्तता होईल , असे मत झाडबुके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्राचे संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

सध्याच्या कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण ऑक्‍सिजन अभावी संकटात आले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे कोरोनामुळे होणारी फुफ्फुसाची हानी आणि त्यामुळे निर्माण होणारा शरीरातील ऑक्‍सिजनचा तुटवडा हा होय. अशा परिस्थितीत एसडब्ल्यू थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येईल.

एसडब्ल्यू थेरपी म्हणजे सॅच्युरेटेड वॉटर थेरपी असून या थेरपीत ऑक्‍सिजनचा पुरवठा पाण्यामार्फत पोटातून करता येईल. एअरेटरचा (एअरपंप फिशपॉंडमध्ये वापरतात) वापर करून अतिथंड पाण्यात हवा सोडून त्यामधील ऑक्‍सिजन विरघळवता येतो.

एक लिटर पाणी सॅच्युरेटेड करण्याकरिता केवळ एक तास लागतो. या पद्धतीने बारा मिलिग्रॅम प्रतिलिटरपर्यंत ऑक्‍सिजन पाण्यात विरघळवता येतो. त्याचे वास्तविक नैसर्गिक पद्धतीने साध्या पाण्यामध्ये हेच प्रमाण केवळ पाच ते सहा मिलिग्रॅम प्रतिलिटर एवढे असते.

अशाप्रकारे तयार केलेले 500 ते 800 मिलिलिटर सॅच्युरेटेड वॉटर पिण्यायोग्य थंड असताना रुग्णाला प्यायला द्यावे. पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचे आहे. हे पिल्यानंतर पुढील एक ते दीड तास कुठल्याच प्रकारचा व्यायाम अथवा श्रम करायचे नाही.

या काळात पाण्याचे शोषण लहान आतड्यांमधील पेशींमध्ये आणि रक्तामध्ये निष्क्रिय शोषण (पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन) या पद्धतीने होते. त्यामुळे साहजिक रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते. ऑक्‍सिजन पाण्यात जरी कमी प्रमाणात विरघळत असला आणि रक्तात त्या प्रमाणात पाठवला जात असला तरी शरीरातील ऑक्‍सिजन तुटवड्याच्या परिस्थितीत ते प्रमाण मोलाचे ठरते.

शरीरात अशाप्रकारे पोटातून ऑक्‍सिजनचा पुरवठा केल्यामुळे फुफ्फुसाकडून होणाऱ्या ऑक्‍सिजन पुरवठ्याची मागणी कमी होते आणि त्यामुळे फुफ्फुसाला थोडी का होईना, विश्रांती मिळते. याचा फायदा म्हणजे रुग्णाला आलेला थकवा कमी होण्याची शक्‍यता वाढते.

रुग्णाने या सॅच्युरेटेड थेरपीचा वापर केल्याने लहान आतड्यांतील पेशी अतिकार्यक्षम होऊन पोटातील इतर विकाराच्या त्रासातून हि रुग्णाची काही प्रमाणात सुटका होऊ शकते. सॅच्युरेटेड वॉटर थेरपीचे दुष्परिणाम नसल्याने पोस्ट कोव्हिड तसेच घरी क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी प्रभावी ठरू शकते, असे प्रा. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Please follow and like us: