नरेंद्र मोदी हे ‘देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता’ -पृथ्वीराज चव्हाण

टिओडी मराठी, सातारा, दि. 13 मे 2021 – सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनामुळे हाहाकार माजला असून कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णतः अपयशी ठरले आहेत, अशी टीका काॅंग्रेसमधून होत आहे. ज्येष्ठ नेेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण  यांनी आज (बुधवार) पंतप्रधान मोदी यांना देशातील ‘सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता’ असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन परफोर्मिंग असेट आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे. आमदार चव्हाणांनी नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह केलेले ट्विट चर्चेत आलंय. त्यात भारतातील सर्वाेच्च नाकर्ती (बिनकामाची) मालमत्ता आहे, असे चव्हाण यांनी माेंदीना म्हटलंय.

यासह गंगा नदीत सापडलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्णांच्या मृतदेहावरूनही भाजपावर टीका केलीय. आमदार चव्हाण यांच्या टविटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

कोरोनाच्या काळात मोदी सरकारवर काॅंग्रेसकडून सातत्याने समाज माध्यमातून हल्ला चढविला जातोय. कोरोना रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झालीय, असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीची नेटिझन्सनी दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून परदेशातूनही टीका हाेतेय. आता भारतातील सर्वाेच्च नाकार्ती, बिनकामाची मालमत्ता म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केलीय.

Please follow and like us: