TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 ऑगस्ट 2021 – उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पदक देऊन गौरव केला. यापैकी सर्वाधिक पदके महाराष्ट्राला मिळाले असून राज्यातील 11 अधिकार्‍यांचा गौरव केला आहे.

पोलिसांत तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा. तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केलेत.

राज्यातील पद्मजा बढे- एसीपी, अल्का जाधव- एपीआय, प्रीती टिपरे- एसीपी, राहुल बहुरे- एपीआय, मनोहर पाटील- पीआय,बाबुराव महामुनी- डीव्हायसपी, अजित टिके- डीव्हायसपी, सुनील कडसने- एसपी, उमेश पाटील- डीव्हायसपी या अधिकार्‍यांना गौरवले आहे.

ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहेत.

तसेच या मानकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस दलातील 8 आणि बिहारचे 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी 6 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 28 महिला पोलीस अधिकारी हि समाविष्ट आहेत.