TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 ऑगस्ट 2021 – पुण्यात 7 फेब्रुवारीला रोजी टिकटाॅक स्टार असलेल्या 22 वर्षीय तरूणीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले गेले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार आहे.

आत्महत्या करण्याच्या तीन ते चार दिवसांअगोदर त्या तरूणीने संजय राठोड यांच्याशी सुमारे 90 मिनिटे फोनवरून संवाद साधला होता. पोलिसांनी तरूणीचा फोन फाॅरेन्सिक पथकाकडे पाठवला होता.

त्यानंतर ही माहिती पोलिसांना समोर आली. संजय राठोड यांच्याशी झालेले संवाद त्या तरूणीने आपल्या फोनमध्ये रेकाॅर्ड करून ठेवले होते. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार आहेत, असे दिसतंय.

तरूणीच्या मोबाईलमधून काही पुरावे हाती लागलेत. तरूणीशी बोलत असलेली व्यक्ती संजय राठोड आहे, असे समजतंय. तिने सर्व संभाषणे रेकाॅर्ड केलीत. बंजारामध्ये सर्व संभाषणे असून त्याचं भाषांतर सुरू आहे, असे पोलिसांकडून समजतंय.

तर, सीसीटीव्हीमध्ये संजय राठोड यांचे सहकारी अरूण राठोड सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, असेही आढळलं आहे. आत्महत्येपूर्वी 24 तासाचं फुटेज पोलिसांनी मिळवलंय. या माहितीद्वारे पोलीस पुढचा तपास करत आहेत. तसेच याअगोदर तरूणीच्या मोबाईलचा डाटा हि फाॅरेन्सिक सायन्सला पाठविला होता.