TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 मे 2021 – गुजरात राज्यातील सूरतमध्ये भाजपकडून कापूर-ओवा-लवंगीचे मिश्रण असलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, भाजपचे प्रचार चिन्ह, प्रदेशाध्यक्षांचे नाव आणि ‘नमो ऑक्सिजन आयुर्वेदिक बुस्टर’ अशा नावासह दिले जात आहे.याबाबत सोशल मीडिया अधिक प्रमाणात टीका होत आहे. कोरोना काळात प्रसिद्धीची हाव अधिक असल्याचे समजत आहे.

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन, औषधांच्या पुरवठ्यात अनेक अडचणी जाणवत आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यासारखी स्थिती अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणून सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आपल्यापरीने मदतीसाठी पुढाकार घेत आहेत, असे चित्र एका बाजूला असताना भाजपच्या काही नेत्यांकडून मात्र, या स्थितीतही झळकण्याची धडपड सुरू ठेवली असल्याचे पहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, मुख्यमंत्री रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, स्थानिक आमदार आणि शहर अध्यक्ष अशी नावे या पाकिटावर छापलेली दिसत आहेत.

नवसारीचे खासदार आणि भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात मजूरांना घरी पाठवण्यास आणि अन्न पुरवठा करण्यास मोठी मदत केली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी लोक आदर व्यक्त करत होते. मात्र, आता अशा प्रकारच्या जाहिरातबाजीने चांगली मदत झाकली जात आहे, अशी भावना लोकांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर होतेय टीका :
सध्या सोशल मीडियावर दोन चित्र व्हायरल होत आहेत. ज्यात एका बाजूला ‘नमो ऑक्सिजन आयुर्वेदिक बुस्टर’ पाकिटाचे चित्र ज्यावर मोदींचा फोटो, भाजपच्या नेत्यांची नावे आहेत तर, दुसऱ्या बाजूला ‘USAID… From the American People’ असे लिहिलेले अमेरिकेच्या मदत कार्याचे फोटो दिसत आहे.