TOD Marathi

परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 12 मे 2021 – सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात वाढता संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाउन लावले आहे. अशा काळात रिक्षाचालकांना देखील 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा विचार सरकारने केला आहे. मात्र, यासाठी रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही, असे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय याअगोदर शासनाने घेतलाय. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरूय.

ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आणि रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले जाणार आहे. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची गरज नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी सांगितले आहे.