TOD Marathi

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Bollywood Singer Neha Kakkar) तिच्या नव्याने आलेल्या ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यासाठी सध्या ट्रोल होत आहे.  नुकतेच नेहा कक्करने फाल्गुनी पाठकचे (Singer Falguni Pathak) सुपरहिट गाणे ‘मैंने पायल है छनकाई’ रिक्रिएट करताना ‘ओ सजना’ गायले आहे. ज्यासाठी तीला सोशल मीडिया यूजर्सने तसेच खुद्द फाल्गुनी पाठकनेही फटकारले होते. ट्रोल झाल्यानंतर स्वतः नेहा कक्करने लोकांना उत्तर दिले आहे. शनिवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक लांबलचक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेहा कक्करने लिहिले, “आज मी कसे अनुभवत आहे? या जगात खूप कमी लोक आहेत जे मला इतक्या लहान वयातही भेटले आहेत. अशा प्रकारचे प्रेम, प्रसिद्धी, सुपरहिट गाणी, वर्ल्ड टूर,  लहान मुलांपासून ते 80-90 वर्षांचे चाहते आहेत. तुम्हाला माहित आहे की मला हे सर्व का मिळाले? ते माझ्या प्रतिभा, मेहनत, समर्पण आणि माझ्या सकारात्मकतेमुळे. म्हणून आज मला फक्त देवाचे आणि त्या लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला आयुष्यात खूप काही दिले.”

याशिवाय, नेहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट व्यतिरिक्त स्टोरी देखील शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये ती ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत आहे. ती म्हणाली की ज्यांना तिला आनंदी आणि यशस्वी पाहून आनंद होत नाही, त्यांना त्याचे वाईट वाटते. तीनी लिहिले आहे, ‘गरीब… कृपया टिप्पणी करत रहा. मी त्यांना हटवणारही नाही. कारण नेहा कक्कर म्हणजे काय हे मला आणि इतर सर्वांना माहीत आहे. असे वाईट बोलून तुम्ही माझा दिवस खराब करणार असा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगते की मी स्वतःला नशीबवान समजत आहे, कारण मी देवाची मुलगी आहे नेहमी आनंदी असते कारण देव तिला आनंदी ठेवतो