TOD Marathi

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 31 जुलै 2021 – जगात थैमान घालणाऱ्या करोनाचा अद्याप नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही. त्यात हा विषाणू दररोज नवे रूप धारण करून आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. याच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा गंभीर इशारा दिलाय. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.

या डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार जो अगोदर भारतात सापडला आहे. आता १३२ देश आणि प्रदेशांत आढळला आहे, असे आरोग्य संघटनेने सांगितले.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन म्हणाले, डेल्टा कोरोना एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे. पण, याचे धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी ही याबाबत भाष्य केलं आहे. आतापर्यंत, चार चिंताजनक करोना व्हायरसचे प्रकार समोर आलेत. व्हायरस पसरत राहिल्याने आणखी प्रकार येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांत मागील चार आठवड्यांत सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे, असे टेड्रॉस यांनी सांगितले आहे.

तर रायन म्हणाले, जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले आहे. तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय केले जात आहेत. यात विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येईल. ‘व्हायरस फिटर झालाय, व्हायरस वेगाने वाढत आहे.

करोना रोखण्यासाठी हे उपाय आणखी काम करत आहेत. पण, आपल्याला अगोदरपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या भारतातील तिसऱ्या लाटेचे कारण बनत आहे. डेल्टा प्रकार जगामधील अनेक देशांत करोनाच्या चौथ्या लाटेचे कारण बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, करोनाच्या डेल्टा प्रकाराने मध्य-पूर्व देशांमध्ये चौथ्या लाटेचे स्वरूप घेतलं आहे. करोनाच्या प्रकरणांत तीव्र वाढ झालीय. मध्यपूर्वेतील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.

ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने गुरुवारी एका निवेदनात असे म्हटले आहे की, डब्ल्यूएचओच्या पूर्व भूमध्य प्रदेशातील डेल्टा व्हेरिएंटमुळे करोनाच्या प्रकरणांत वाढ होत आहे. हे व्हेरियंटमुळे मृत्यू होत आहेत. या क्षेत्रातील २२ पैकी १५ देशांपैकी आतापर्यंत करोनाची चौथी लाट येत आहे, असे चित्र आहे.