TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्स याने बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बीसीसी धमकी देत आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड त्याला काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळण्यापासून थांबवत आहे. याअगोदर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने ही बीसीसीआयवर असे आरोप केले होते. त्यांच्या मते, माजी क्रिकेटपटू KPL मध्ये सहभाग घेतील, त्यांना भारतीय क्रिकेटमधील कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही.

लतीफनंतर आता गिब्सने बीसीसीआयवर ट्विटद्वारे आरोप केलेत. त्याने लिहिलंय कि, बीसीसीआय पाकिस्तानशी भारताच्या बिघडलेल्या राजनीतिक समीकरणांमुळे मला KPL मध्ये खेळण्याची परवानगी देत नाहीत.

तसेच मी असे केल्यास मला भारतातील कोणत्याही क्रिकेट संबंधी कार्यक्रमात आणि स्पर्धांत सहभाग घेऊ देणार नाही, अशी धमकीही दिली जातेय. सध्या KPL साठी हर्शल गिब्स, मोंटी पानेसर, तिलकरत्ने दिलशान या खेळांडूंची निवड झालीय.

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये 6 संघ खेळणार आहेत. ओवरसीजन वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावलकोट हाक्स, बाघ स्टालियंस, मीरपुर रॉयल्स आणि कोटली लायन्स अशी या संघाची नवे आहेत. तर इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल हे या संघाचे कर्णधार आहेत.