TOD Marathi

टिओडी मराठी, लंडन, दि. 4 ऑगस्ट 2021 – दोन वर्षांपासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अदयाप ठोस लस आलेली नाही.  त्यामुळे आता शास्त्रज्ञ ऑल इन वन’ लस तयार करण्याच्या मागं लागले आहेत. यासाठी सुपर व्हॅक्सिन बनविण्याकडे कल दिला आहे. कारण, हेच सुपर व्हॅक्सिन मानवच भविष्य ठरविणार आहे, असे समजत आहे.

त्यामुळे जगातील अनेक भागात याबाबत संशोधन सुरु आहे. आताच्या ज्या लस आहेत, त्या कोरोना नियंत्रणात आणता येतील आणि त्याचा संसर्ग कमी करता येईल. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवेल आदी बाबींशी निगडित आहेत, असं समजत आहे.

अशा संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोएलेशन फॉर एपिडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशन्सने (सीईपीआय) ५ वर्षांची योजना सुरू केलीय. यावर २.५ बिलियन पाऊंड्स खर्च करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकणारी लस तयार करण्याचं काम सध्या शास्त्रज्ञांनी सुरू केलंय. यासाठी अमेरिकन कंपनी व्हीबीआय व्हॅक्सिन्ससोबत करार केला आहे.

कोरोनाच्या संभाव्य व्हेरिएंट्सचा धोका लक्षात घेऊन ऑल इन वन लस तयार केली जाणार आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्समधील समान गोष्टींचा अभ्यास करून ऑल इन वन व्हॅक्सिनची निर्मिती केली जाणार आहे.

आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व्हेरिएंट आढळून आलेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर देशात डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळून आलेत.