TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 6 ऑगस्ट 2021 – ज्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे, अशा चीन देशाने आता जगातील देशांना कोरोना विरोधी लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी यंदाच्या वर्षात जगातील विविध देशांना कोरोना विरोधी लसीचे २०० कोटी डोस मोफत देणार आहे, असे आश्वासन दिलंय. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीमध्ये जगात सर्वात अग्रेसर देश म्हणून चीन स्वत: जागतिक पातळीवर प्रतिमा तयार करत आहे.

कोरोना विरोधी लसीच्या पुरवठ्याबाबत आयोजित आंतरराष्ट्रीय फोरममध्ये चीनने यासंदर्भातील घोषणा केली. या फोरमचे आयोजन चीनने डिजिटल माध्यमातून केलं होतं.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, चीनने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दान किंवा निर्यात केलेल्या ७७ कोटी कोरोना लसीच्या डोसचा देखील यात समावेश आहे. चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या कोरोना लसच्या डोसेसची जागतिक पातळवीर द्विपक्षीय कराराअंतर्गत निर्यात केली जाते.

कोरोना लसच्या किमतीवरुन आतापर्यंत अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा व्हेरिअंटचा वाढता प्रभाव आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता लसच्या किमतीवरुन बरीच चर्चा होत आहे. चीन कोरोना लसच्या वापरासंदर्भात राजकीय फायदा घेण्याच्या मानसिकतेत आहे, असा आरोप देखील केला जात आहे.