TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’ च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उखळून त्याच्या वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले आहेत, असा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केलाय.

राम कदम यांनी सांगितले कि, राज कुंद्र याने या गेमच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव आणि फोटोंचा वापर केला होता. राजु कुंद्राने ऑनलाईन गेम गॉडच्या माध्यमातून फसवणूक केली आहे.

विआन कंपनीचा गॉड नावाचा एक खेळ असून तो कायदेशीर ऑनलाइन गेम आहे, असे सांगितले होते. या खेळाच्या माध्यमातून 2500 ते 3000 कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केलाय.

ऑनलाईन गेमच्या नावाखाली कुणाकडून 30 लाख तर कुणाकडून 15 ते 20 लाख रुपये घेतलेत. गेमच्या डिस्ट्रीब्यूशनच्या नावाखाली लोकांना फसवलं आणि त्यांना लुटलं आहे.

काही जणांना डिस्ट्रिब्यूटरशिप दिली तर काही जणांना तसंच ठेवलं आहे. काहींच्या तत्काळ लक्षात आलं की ही फसवेगिरी होत आहे.अशाप्रकारे गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कुणी दिलाय ? असा सवाल देखील राम कदम यांनी केलाय.

राज कुंद्रा आणि पत्नी- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना सेबीने बुधवारी दंड ठोठावला आहे. उभयतांच्या विआन इंडस्ट्रीजवर समभाग गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियामकाने 3 लाख रुपये भरण्याचा आदेश जारी केलाय. हिंदुस्थान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाणाऱ्या विआन इंडस्ट्रीजचे राज आणि शिल्पा प्रवर्तक आहेत.

10 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी विआन इंडस्ट्रीज भांडवली बाजारामध्ये सूचिबद्ध कंपनी आहे. राज ऊर्फ रिपू सुदन कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा संचालक असलेल्या विआन इंडस्ट्रीजची सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान केलेल्या चौकशीवर आधारित ही कारवाई केली आहे.