TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये पेगॅससचा प्रयोग केला आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीची चौकशी थांबवण्यासाठी पेगाससचा प्रयोग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शस्त्र आमच्या देशाविरोधात वापरले आहे. त्यासाठी केवळ एकच शब्द आहे ‘देशद्रोह’, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पेगॅसस वापर प्रकरणी म्हटले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला करताना काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

राहुल गांधी यांनी इस्रायलने पेगॅससला क्लासिफाइड शस्त्राच्या यादीमध्ये ठेवले आहे. ते अतिरेकी व गुन्हेगारांसाठी वापरले जाते; परंतु मोदी आणि शहा देशाविरोधात ते वापरत आहेत, असा आरोप केलाय.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पेगॅसस पाळत प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, पेगॅसस सॉफ्टवेअर सरकार किंवा सरकारच्या कोणत्या एजन्सीने विकत घेतले आहे का?.

जर सरकारने विकत घेतले असेल तर जे सॉफ्टवेअर दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांवर वापरले जायला हवे ते आपले अधिकारी, आपलेच राजकीय नेते, आपल्या पक्षाचे नेते, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित लोकांवर वापरले गेले? जर सरकारने वापरले नाही तर मग सरकारने हेरगिरी केलीय.

या पेगॅससचा वापर केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, पी. चिदम्बरम, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाच्या बहुतांश खासदार यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी पाळतीच्या विरोधात घोषणा दिल्या.