TOD Marathi

टिओडी मराठी, श्रीनगर, दि. 24 जुलै 2021 – जम्मू काश्‍मीरमध्ये अनिवासी लोकांना अधिक प्रमाणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाने दिली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे याची चौकशी आता सीबीआय करीत आहेत. सीबीआयने या अनुषंगाने अनेक ठिकाणी छापे सत्र सुरु केलं आहे.

या घोटाळ्याची कुणकुण राजस्थान एटीएसने सन 2017 मध्ये केलेल्या कारवाईतून लक्षात आली. त्यावेळी राजस्थान एटीएसने असे शस्त्र परवाने मिळवलेल्या किंवा त्यासाठी मदत करणाऱ्या किमान 50 जणांना त्यावेळी अटक केलीय.

राजस्थान एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी अधिकाऱ्यांच्या नावानी जम्मू काश्‍मीरातून सुमारे तीन हजार शस्त्र परवाने जारी केले आहेत.

या व्यवहारामध्ये अधिक प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालं आहे. सन 2019 मध्ये दाखल झालेल्या एका केसच्या अनुषंगाने ही कारवाई झालीय.

सन 2012 ते 2016 या अवधीमध्ये जम्मू काश्‍मीरच्या विविध महसुल विभागाच्या उपआयुक्तांनी पैसे घेऊन अधिक प्रमाणावर शस्त्र परवाने जारी केले आहेत, हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.