TOD Marathi

नवी दिल्ली :
अग्निपथ योजनेची घोषणा होताच देशात या योजनेच्या विरोधाला सुरुवात झाली. विरोध पाहता सरकारने या योजनेत काही बदल करायला सुरुवात केली. यावरून भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी भाजपला (BJP) घरचा आहेर दिला. ‘काही तासांतच ज्या पद्धतीने सातत्याने बदल केले जात आहेत. त्यावरून नियोजन करताना सर्व बाबी विचारात घेतल्या नसल्याचे स्पष्ट होते’ असं ट्विट त्यांनी केले. तसेच त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Varun Gandhi criticizes BJP over Agnipath scheme)

अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर काही तासांतच त्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांवरून असे दिसून येते की नियोजन करताना कदाचित सर्व मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत. देशाचे लष्कर, सुरक्षा आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असेल तेव्हा संवेदनशील सरकारने (BJP) ‘आधी निर्णय, मग विचार’ असं करणे योग्य नाही (criticizes), असेही वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘आदरणीय राजनाथ सिंह जी, देशातील तरुणांच्या मनात अग्निपथ योजनेबाबत अनेक प्रश्न आहेत. तरुणांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढायचे असेल तर सरकारने योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्ये लवकरात लवकर समोर ठेवून भूमिका स्पष्ट करावी’ असं पत्र १६ जूनला वरुण गांधी यांनी राजनाथ सिंह यांना लिहिले होते.

तरुणांच्या संघर्षात मी प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत उभा आहे. सर्वांनी संयमाने वागावे आणि लोकशाही प्रतिष्ठा जपत निवेदन विविध माध्यमातून शासनाला पाठवावे ही नम्र विनंती. सुरक्षित भविष्य हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे, असे आवाहन देखील वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशातून केले होते.