विराटपेक्षा रोहित शर्माचे जास्त फॅन; शोएब अख्तरने केला खुलासा

Virat Kohli - Rohit Sharma - TOD Marathi

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये विराट मोठा फलंदाज असला तरी हिटमनचा म्हणजेच रोहित शर्माचा खेळ पाकिस्तानात कोहलीपेक्षा जास्त आवडतो. याचा खुलासा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे.

शोएबच्या अख्तरच्या मते, चाहते रोहितला भारताचा इंजमाम म्हणतात आणि शेजारच्या देशात त्याला विराटपेक्षा जास्त प्रेम मिळते. प्रसिद्ध वृत्त संस्थेशी संवाद साधताना पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज म्हणाले, पाकिस्तानमधील लोकांना भारतीय क्रिकेटपटू खूप आवडतात आणि त्यांच्या खेळाचे कौतुक करतात.

पाकिस्तान मध्ये विराट कोहलीपेक्षा रोहितचे जास्त कौतुक होते. येथील लोक त्याला भारताचा इंजमाम म्हणतात, असेही शोएब यावेळी म्हणाला. २०१९ च्या विश्वचषकात रोहित पाकिस्तानविरुद्ध खेळला होता, तेव्हा त्याने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

Please follow and like us: