TOD Marathi

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर सहायक आणि लिपिक टंकलेखक परीक्षेतील टायपिंगची परीक्षा संगणक आधारित प्रणालीत घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाचं उमदेवारांकडून स्वागत करण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता राहणार नाही, अशा प्रतिक्रिया उमेदवारांकडू व्यक्त करण्यात आल्या आहेत.

आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचं देखील विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे.