TOD Marathi

आला रे आला… मॉन्सून आला.. !; Monsoon केरळमध्ये, IMD ची ट्विटद्वारे माहिती

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 जून 2021 – यंदा मान्सून वेळेत दाखल झाला आहे. सध्या मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. हवामान विभागाने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. तसेच खासगी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने 31 मे रोजी हंगामी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्याचे जाहीर केले होते. मान्सूनचा अंदाज सांगण्यावरून हवामान विभाग आणि स्कायमेटमध्ये चांगलीच जुंपली आहे.

मान्सूनच्या आगमनावरून हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागात चांगलीच जुंपली होती. स्कायमेटने मान्सून केरळमध्ये दाखल झाला, असे जाहीर केले होते. मात्र, हवामान विभागाने असे म्हटले होते की, मान्सूनसाठी 3 जूनपर्यंत थांबावे लागेल. हवामान खात्याने 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज याअगोदर व्यक्त केला होता, मात्र तो त्यांनी बदलला होता.

स्कायमेटने असे म्हटले होते :
स्कायमेटने देशात मान्सून 30 मे रोजीपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज सांगितला होता. सर्वसामान्य गतीने मान्सून केरळकडे सरकत असून अंदमान-निकोबार द्वीपसमूहामध्ये मॉन्सून 21 मे रोजी दाखल झाला होता. तिथून हंगामी पावसाने उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल सुरू केली. मान्सून 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला.

पुढच्या ३ दिवसांत तो श्रीलंकेच्या उत्तरेकडे पोहचणार होता. 27 मे रोजी मान्सून मालदीवमध्ये दाखल झाला होता त्यावेळी मान्सून केरळपासून 200 किलोमीटर दूर होता. ‘तौकते’ आणि ‘यास’ चक्रीवादळानंतर देशाच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर 30 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज देखील स्कायमेटने व्यक्त केला होता.

तर हवामान विभागाने असे म्हटले होते :
हवामान विभागानं 27 मे रोजी 31 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते. मात्र, सर्वसामान्यपणे देशात 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र नंतर मान्सून 3 जूनपर्यंत देशात दाखल होईल, असे हवामानने म्हटले होते.

दरवर्षीप्रमाणे सामान्य मान्सून राहील, असे सांगत जून ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या तांदूळ, मका तसेच इतर पिके नेहमीप्रमाणे घेऊ शकता, असे हवामान विभागाने म्हटले आहे.