TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 जून 2021 – पुढील 3 दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागाने आज रेड अलर्टचा इशारा दिला आहे. तर 18 जून रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. तसेच पुढील काही तास मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे, त्या माहितीनुसार, 17 जून रोजी सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

18 जून रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. तसेच पुढील तीन दिवसांत मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

तर 19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.