TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 जुलै 2021 – मुसळधार पावसामुळे कसारा घाटामध्ये बुधवारी (21 जुलै) रात्री दरड कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर मुंबई-पुणे, मुंबई – नाशिक रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर तीन दिवसांनी या रेल्वे रुळावर कोसळलेल्या दरडी हटवल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर झालाय. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे रुळावर आल्यात.

मुंबई-पुण्यातील रेल्वे ट्रॅकवर दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद केली होती. मात्र, आता मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातील अडथळा दूर झालाय. त्यामुळे आजपासून पुणे-मुंबई, पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस, मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा सुरु झाल्यात. तसेच डेक्कन क्वीन एक्सप्रेस रुळावर धावणार आहे.

मागील आठवडाभरापासून मुंबईसह राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सह्याद्रीच्या विविध घाटमाथ्यांवर पाऊस बरसतो आहे. सध्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये मान्सूनचा जोर कायम आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई ते पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटामध्ये विविध ठिकाणी दरडी कोसळल्यात. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

घाटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यातील काही दरडी या थेट रेल्वेच्या मार्गावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

दरडी हटवण्याचं काम सुरु :
यानंतर ३ दिवस रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्याचे काम सुरु होतं. मात्र, पावसाचा जोर कायम असल्यामुळे दरडी हटवण्याच्या कामामध्ये अनेक अडथळे येत होते. घाटाच्या परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे.

त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरु होत्या. अखेर कालपासून पावसाने विश्रांती घेतल्याने या दरडी हटवण्याचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे.