Antilia case : NIA कडून एन्काऊंटर स्पेशलिस्ट Pradeep Sharma यांना अटक

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 जून 2021 – एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलीय. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणामध्ये एनआयएने सर्वात मोठी कारवाई केलीय. प्रदीप शर्मा यांची हि आठवी अटक आहे.

प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार व आशिष जाधव यांना मागील आठवड्यात अटक केली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते.

गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करून एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात केलं आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा विषयी :
1983 साली प्रदीप शर्मा हे पोलीस सेवेत रुजू झाले होते. पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदीप शर्मा यांनी 312 गुंडांचा एन्काऊंट केलाय.

कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित केले होते. 2017 मध्ये आरोपांतून क्लीनचिट मिळालीय.

2017 साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली होती. त्यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय. नालासोपाऱ्यामध्ये शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत प्रदीप शर्मा यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे. यात पोलीस दलातून निलंबित झालेले सचिन वाझे, रियाज काझी, सुनील माने यांच्यासह विनायक शिंदे, संतोष शेलार, आनंद यादव यांचा समावेश आहे.

Please follow and like us: