TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियता घटली आहे. त्यामुळे आता मोदी लोकप्रिय नेते राहिले नाहीत. याचा फटका भाजपला पुढील बाबीत बसेल का? असा प्रश्न पडतोय. मात्र, सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीने मोदी मागून पुढे गेलेत, असाही निष्कर्ष काढला आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ६६ टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ५३ टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत.

नरेंद्र मोदी यांचं गुणांकन सुमारे २० टक्क्यांनी घसरलंय. मोदींच्या गुणांकनात घट झाली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलंय. नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत अधिक आहे, असेही सर्व्हेक्षणातून समोर आलंय.

जून महिन्यामध्ये मोदींचं गुणांकन ६३ टक्के इतकं होतं. मात्र, यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकलं आहे, असे त्या कंपनीने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम व अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आलीय.

या सर्व्हेक्षणामध्ये सुमारे २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेतलं होतं. यानुसार ६६ टक्के भारतीयांना नरेंद्र मोदींची बाजू घेतली आहे. तर, २८ टक्के लोकांना मोदींविरोधात गेले आहेत.

मोदींच्या तुलनेत इतर नेत्यांचं गुणांकन पुढीलप्रमाणे :
नरेंद्र मोदी ६६ टक्के
मारियो ड्रॅगी (इटली) – ६५ टक्के
एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (मेक्सिको) – ६३ टक्के
स्कॉट मॉरिसन (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के
अँजेला मार्कल (जर्मनी) – ५३ टक्के
जो बायडन (अमेरिका) – ५३ टक्के
जस्टिन ट्रूडो (कॅनडा) – ४८ टक्के
बोरिस जॉन्सन (युके) – ४४ टक्के
मून जे-इन (दक्षिण कोरिया) – ३७ टक्के
पेड्रो सांचेज़ (स्पेन) – ३६ टक्के
जायर बोल्सोनारो (ब्राझील) – ३५ टक्के
इमैनुएल मॅक्रॉन (फ्रान्स) — ३५ टक्के
योशीहिदे सुगा (जपान) – २९ टक्के