TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 18 जून 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना लस घेतल्यास 10 लाखांची कार मोफत मिळेल आणि लकी ड्रॉमधून 20 लोकांची नावे काढली जातील, असे सांगितले आहे. त्यामुळे या देशात लसीकरणाला चालना मिळत आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना लसीकरण मोहिम संथ गतीने सुरूय. लोक स्वतः होऊन पुढे येऊन लस घेत नाहीत. अशा परिस्थितीत मॉस्कोच्या महापौरांनी एक आगळीवेगळी ऑफर जाहीर केली. या ऑफर अंतर्गत, जो स्वतः होऊन पुढे येऊन कोरोनाची लस घेणार त्याला 10 लाख रुपयांपर्यंतची नवीन कार बक्षीस म्हणून देणार.

मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यनिन हे आहेत. मागील काही दिवसांत देशात कोरोना लसीकरण मोहिमेची गती मंदावलीय, असं केल्यास लसीकरणाचे प्रमाण वाढेल, अशी त्यांना आशा असल्याचे ते म्हणालेत.

ते म्हणाले आहेत की, 14 जूनपासून 18 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले लोक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेणार्‍या लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेणे गरजेचं आहे. ही योजना केवळ 11 जुलैपर्यंत लागू असणार आहे.

लकी ड्रॉमधून 20 नावे काढणार
सर्व लोकांना कार देण्यात येणार नाही, त्यामुळे सेर्गेई सोब्यनिन यांनी स्पष्ट केलं आहे कि, विजेत्यांची नावे लकी ड्रॉमधून काढणार आहेत. लकी ड्रॉमधून निवड झालेल्या 20 लोकांना 20 कार मोफत दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.