TOD Marathi

TET पास सर्टिफिकेट Lifetime वैध राहणार; केंद्र सरकारचा निर्णय, लाखो शिक्षकांना दिलासा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – सरकारी शिक्षक बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतू वशिलेबाजी आणि दर्जेदार शिक्षकांचा अभाव यामुळे केंद्र सरकारने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य केलं होते. केंद्र सरकारने देशभरातील शिक्षकांना आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा दिलाय.

केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेची 7 वर्षांची वैधता संपुष्टात आणली होती. शिक्षक किंवा इच्छुक उमेदवार एकदा का टीईटी परीक्षा पास झाला की, त्याचे ते प्रमाणपत्र सात वर्षेच वैध होते.

ही मुदत संपवून केंद्र सरकारने एकदा परीक्षा पास झाला की टीईटी प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाचे म्हणजे, हा निर्णय 2011 पासून लागू करण्यात येणार असल्याने लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय.

शिक्षण मंत्रालयाने आज याची घोषणा केली असून या शिक्षण मंत्रालयाने असे सांगितले की, टीचर इलिजिबिलीटी टेस्टची वैधता आता लाईफटाईम असणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना 2011 मध्ये टीईटी पास केली आहे, तर त्यांचे सर्टिफिकेट आयुष्यभरासाठी वैध असणार आहे.

सरकारी शाळांत किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे आवश्यक आहे. तसेच जे शिक्षक नोकरी करतात त्यांनाही टीईटी पास होणे आवश्यक आहे.

अगोदरच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आत तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे शिक्षकांचे टेन्शन मिटले आहे.