TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई दि. 18 मे 2021 – कोरोना हाताळण्यासह आता लसीकरणात ही महाराष्ट्राने देशात ‘अव्वल’ तहान मिळविले आहे. सुमारे 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशभरात लसीकरणाची मोहीम सुरुय. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केलंय.

या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र पुढे असून एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशात एकमेव राज्य ठरले आहे. सोमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लस दिली आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलीय.

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसचा पहिला डोस दिला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून त्या पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

राज्यात सोमवारी २६ हजार ६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ५१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत अधिक प्रमाणात घट झालीय.

मागील काही दिवसात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या घरात आली आहे. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ रुग्ण उपचाराधिन अआहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ४८,२११ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४८,७४,५८२ काेरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९ टक्के झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.५३ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यालेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आलेत.