TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 18 मे 2021 – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन, कडक निर्बंध, संचारबंदी आदी नियम लागू केले जात आहेत. सरकारला केवळ आपण कसे चांगले काम करतोय आणि कोरोना नियंत्रणात आणतोय, एवढं सांगून लोकांची मनं जिंकायची आहेत. मात्र, याच काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लातूर येथील त्या युवकांनी माणुसकीच दर्शन घडवून नवा सामाजिक आदर्श घालून दिला आहे.

सध्या कोरोनामुळे अनेकांचे हाल होत आहेत. त्यात ज्या घरात कोरोना रुग्ण असेल तर, त्या घरात काही शिजेल असं वाटतं का? नाही ना. म्हणून लातूर येथील पंचवीशीतल्या त्या 10-12 तरुणानी एकत्र येऊन स्वतःचे पैसे गोळा करून रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अविरतपणे जेवणाचा डबा देत आहेत.

देशावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे या युवकांनी दाखवून दिले. आजपर्यंत या युवकांनी 6,000 डबे पुरवले आहेत आणि आणखी डबे पुरवत आहेत. त्यांच्या या अभिनव उपक्रमासाठी अनेकांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांचं विविध स्तरावर कौतुक होत आहे. कारण हीच युवा पिढी उद्याचा उज्वल भारत घडवेल, यात काही शंका नाही.

हेच आदर्शवत युवक :
यासाठी अमर आळंगे,चारुदत्त गिरी,पंचम पाटील,सिद्धेश्वर पटणे, अनिकेत वाघमारे, गौरीशंकर हात्ते, चारुदत्त गिरी, दर्शन स्वामी, शिवपुत्र स्वामी, श्रीकांत लोहकरे, सूरज सूर्यवंशी, रोहन देशमुख, अक्षय जावळे, अक्षय शेळके, महेश आचवले, आदित्य गिल्डा, महेश गिल्डा आदी युवक काम करत आहेत.

येथे सुरु आहे सेवा :
स्व.विलासराव देशमुख स्पेशलिटी हॉस्पिटल आणि विवेकानंद हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल सनराइज् हॉस्पिटल गांधी हॉस्पिटल , महिंद्रकर हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये सेवा सुरु आहे. इच्छुकांनी डबे हवे असल्यास या ठिकाणी येऊन भेटावे.