सायरस पूनावाला म्हणाले, मी आणि मुलगा भारत देश सोडून पळालो नाही, लंडनला सुट्टीवर आलोय

टिओडी मराठी, दि. 18 मे 2021 – सध्या भारतात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशातच लस निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक पुनावाला लंडनला गेले आहेत. त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्यामुळे लंडनला आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, देशात पुनावाला भारत देश सोडून पळून गेले असल्याचं वातावरण तयार केलं आहे. यावर सायरस पुनावाला म्हणाले, मी आणि माझा मुलगा अदर देश सोडून पळून गेल्याच्या वावडय़ा उठवल्या आहेत. आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी ‘या अफवा’ मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्याच आहेत.

प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येत असते. त्यामुळे आम्ही आमचा देश सोडून कुठेही पळालो नाही, असे स्पष्टीकरण पूनावाला उद्योग समूहाचे मालक सायरस पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे.

सध्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हेहि लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आलाय. देश सोडून गेल्याच्या वावडय़ा उठू लागल्यात. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचे खंडन केलं आहे.

Please follow and like us: