TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 10 मे 2021 – कोरोनाच्या पहिल्या वर्षात जगातील विविध कंपन्यांना लस बनविण्यात यश आले. कोणत्या कंपनीची कोणती लस प्रभावी यावर मतांतरे आहेत. चीनसारख्या देशांच्या काही लसी फेल ठरल्या. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामध्ये ब्रिटनमधून भारतीयांसाठी एक मोठी दिलासा देणारे वृत्त आहे. ते म्हणजे ‘कोव्हिशिल्ड’ लस ब्रिटनमध्ये प्रभावी ठरली असून यामुळे 80 टक्के मृत्यू घटले आहेत.

ब्रिटनमध्ये जगातील वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले. ऑक्‍सफर्ड- एस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेणाऱ्य़ा लोकांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात आढळले.

लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेल्यांच्या मृत्यूमध्ये 80 टक्के घट झाली. ही तीच लस आहे ज्या लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु झाले. तसेच ही लस भारतामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून ओळखली जाते.

पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या संशोधनानुसार, अॅस्ट्राझिनेकाच्या लसचा पहिला डोस घेतल्यास कोरोनामुळे मृत्यूचा धोका हा 80 टक्क्यांनी कमी होतो. तर अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस घेतल्य़ास दोन डोसनंतर मृत्यूचा धोका हा 97 टक्क्यांनी कामी होत आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी या आकड्यांची प्रशंसा केलीय. हे आकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत की, लस कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी प्रभावी आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार, आतापर्यंत देशात जेवढे लसीकरण झाले आहे. त्यातून 10000 लोकांचे जीव वाचविता आलेत. ब्रिटनची लोकसंख्या ही 1 कोटी 80 लाख एवढी आहे. यापैकी तीन वयस्कर व्यक्तींमागे एकाला कोरोना लस टोचली आहे. यामुळे ब्रिटनेमध्ये कोरोना संक्रमण, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन आणि मृतांचा आकडा खूप कमी झालाय. यामुळे आता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सरकार नागरिकांना कोरोनामुळे लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार करत आहे, असे सूतोवाच केले आहे.