TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 18 मे 2021 – श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती मंदिरात भीक मागणारा भिकारी देखील श्रीमंत आढळला. पोलिसांनी भीक मागणार्‍याच्या घरात शोध घेतला तेव्हा त्यांना दोन पेटी भरून नोटा सापडल्या. पोलिसांचा खूप वेळ पैसे मोजण्यात गेला. त्यानंतर नेमकी रक्काम किती आहे? हे समजले. एकूण रक्कम 6 लाख 15 हजार 50 रुपये इतकी होती. मात्र, हे कसे सापडले याची एक बाब वेगळीच आहे.

तिरुपती मंदिरात श्रीनिवासन नावाचा व्यक्ती भीक मागत असायचा. त्याचे वयाच्या 64 वर्षी निधन झाले. श्रीनिवास तरुण असताना तिरुपती मंदिरात आला आला आणि त्याने भीक मागायाला सुरूवात केली.

श्रीनिवासन हा शक्यतो व्हीआयपी लोकांकडे भीक मागत होता. त्यांना टिळा लावायचा आणि व्हीआयपी, सेलिब्रिटी लोक त्याला पैसे देत होते. पैसे घेतल्याशिवाय श्रीनिवासन त्यांची पाठ सोडत नव्हता. लग्नानंतर जेव्हा दीपीका पदुकोण आणि रणवीर सिंह तिरुपती दर्शनासाठी आले होते, तेव्हा श्रीनिवासने त्यांनाही टिळा लावून त्यांच्याकडून पैस घेतले. अशाप्रकारे त्याने भरपूर पैसे जमा केले

काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याला कोणी नातेवाईक नव्हते. म्हणून त्या भागातील काही लोक त्याच्या घरावर अनधिकृत ताबा मिळवण्याच्या प्रयत्न करत होते. पोलिसांना हे समजले तेव्हा त्यांनी महसूल खात्यासह श्रीनिवासनच्या घरावर छापा मारला.

या छाप्यात त्यांना दोन पेटी भरून नोटा आढळला. संपूर्ण दिवस कर्मचार्‍यांनी या नोटा मोजल्या. तेव्हा एकूण रक्कम 6 लाख 15 हजार 50 रुपये इतकी होती. ही रक्कम सरकारने ताब्यात घेतली असून याची पुढील कारवाई सुरू आहे.