कोल्हापुरातील Public Health Department मध्ये मोठी पदभरती ; 75 हजार रुपये मिळणार पगार, लवकर करा अर्ज

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 22 जुलै 2021 – कोल्हापूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये वैद्यकीय विविध पदाच्या जागा रिक्त असून यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यातही ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जुलै 2021 हि आहे.

यात मायक्रोबायोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, एमडी फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्नोनिशियन, एक्स-रे टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि एएनएम आदी पदे आहेत.

मात्र, उमेदवारांनी याबाबत संबंधित विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी. किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

या पदांसाठी होणार भरती :

 1. (Microbiologist) मायक्रोबायोलॉजिस्ट
 2. (Pediatrician) बालरोगतज्ञ
 3. (MD Physician) एमडी फिजिशियन
 4. (Intensivist) इंटेन्सिव्हिस्ट
 5. (Medical Officer) मेडिकल ऑफिसर
 6. (Lab Technician) लॅब टेक्नोनिशियन
 7. (X-Ray Technician) एक्स-रे टेक्नीशियन
 8. (Pharmacist) फार्मासिस्ट
 9. (Staff Nurse) स्टाफ नर्स
 10. (ANM) एएनएम

यासाठी हि आहे पात्रता :
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं. तसेच अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.

एवढा मिळणार पगार :

 1. मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) – 75000/-
 2. बालरोगतज्ञ (Pediatrician) – 75000/-
 3. एमडी फिजिशियन (MD Physician) – 75000/-
 4. इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) – 75000/-
 5. मेडिकल ऑफिसर (Medical Officer) – 60000/-
 6. लॅब टेक्नोनिशियन (Lab Technician) – 28000/-
 7. एक्स-रे टेक्नीशियन (X-Ray Technician) – 17000/-
 8. फार्मासिस्ट (Pharmacist) – 17000/-
 9. स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20000/-
 10. एएनएम (ANM) – 18000/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Please follow and like us: