सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी Bombay High Court मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – सेवानिवृत्त होऊनही काहींना नोकरी करावी असे वाटते, अशांना मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आता मुंबई हायकोर्टात लवकरच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. न्यायिक अधिकारी या पदाच्या एकूण 06 जागा भरणार आहेत.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी न्यायिक अधिकारी पदासाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल आयडीवर अर्ज सादर करावे लागणार आहेत. याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे :

भरतीचे पद :
न्यायिक अधिकारी (Judicial Officer) – एकूण जागा 06

अशी आहे पात्रता :
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिर्वतत अधिकारी असणे गरजेचं आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे :
मुंबई फोर्ट मुंबई – कुलसचिव जनरल उच्च न्यायालय – 400032
ई-मेल आयडी – rglegal-bhc@nic.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी अधिकृत मुंबई हायकोर्टाच्या संकेतस्थळाला भेट द्या.
https://bombayhighcourt.nic.in/index.php

Please follow and like us: