TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशन वादळी ठरले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांचे निलंबित केले आहे. 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित केले असून सभागृहात ठराव मंजूर केला आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की, भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी 12 आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर, गिरीश महाजन,पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखलकर, नारायण कुचे आणि बंटी बंगडीया या आमदारांचा समावेश आहे. हा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे, असे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी हेडफोन फेकून दिला :
राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा, असा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. पण, यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.

भुजबळांनी पुराव्यानिशी फडणवीसांचा काळात झालेल्या पत्रव्यवहारच सभागृहामध्ये वाचून दाखवला. त्यावर देवेंद्र फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले पण, सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही.

त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हेडफोन- माईकच फेकून दिला. या गोंधळात ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर केला.

सभागृहात काय घडलं नेमकं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला.

एवढंच नव्हे तर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक झाली.

सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

  • हे आहेत 12 निलंबित आमदार :
    १) गिरिश महाजन
    २) संजय कुटे
    ३) अभिमन्यु पवार
    ४) आशिष शेलार
    ५) पराग आळवणी
    ६) योगेश सागर
    ७) राम सातपुते
    ८) नारायण कुचे
    ९) अतुल भातखळकर
    १०) बंटी भागडिया
    ११) हरिष पिंपळे
    १२) जयकुमार रावल