ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती होणार ; असा करा अर्ज, भरणार 43 जागा

टिओडी मराठी, बंगलोर, दि. 5 जुलै 2021 – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इसरोमध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. इसरो अंतर्गत पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस या पदांची भरती होणार असून यामध्ये एकूण 43 जागा भरणार आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती :
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice)
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice )

एकूण जागा – 43 आहेत.

अशी आहे शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice) – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिग्री.

तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.

एवढा पगार मिळेल :
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice) – 9,000 रुपये
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) – 8,000 रुपये

मुलाखतीची तारीख – 22 जुलै 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
http://portal.mhrdnats.gov.in/

Please follow and like us: