TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 जून 2021 – भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणामधील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अखेर अटक केली आहे. हि कारवाई पुणे पोलिसांनी केली. कांडरेच्या अटकेमुळे आणखी मोठे मासे गळ्याला लागण्याची शक्यता वर्तविली आहे.

सोमवारी पुणे पोलिसांच्या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री मध्यप्रदेशातील इंदूर इथून जितेंद्र कांडरे यास अटक केली आहे. ‘बीएचआर’ आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाडून 17 जूनला धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ आणि अंमळनेर धडक कारवाई करून 13 जणाना अटक केली होती.

यात भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भूसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोहार (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रमोद किसनराव कापसे (अकोला),प्रेम नारायण कागोटा (पुणे) अशा 13 जणांचा समावेश आहेत. त्यात जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापतीसह, जळगावमधील व्यावसायिक भागवत भंगाळे याचा समावेश होता.