TOD Marathi

Vitamin B-12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

टिओडी मराठी, दि. 29 जून 2021 – मानवी शरीराला व्हिटॅमिन बी -12 ची अधिक आवश्यकता असते. मानवी शरीर हे जीवनसत्त्व बी 12 ची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे ते अंडी, मांस, मासे, डेअरी किंवा इतर पदार्थातून मिळवता येते. हे जीवनसत्त्व बराच काळ शरीरात साठवून ठेवता येणारे नाही. ठराविक कालावधीनंतर बी असा आहार घ्यावा लागतो.

जीवनसत्त्व बी 12 ला सामान्यपणे ऊर्जा जीवनसत्त्व हि संबोधतात. मानवी शरीराकरिता हे पॉवर हाऊस असते, जे डीएनए, चेतापेशी व रक्‍तपेशींची निर्मिती करण्यात मदत करते. मेंदू, रोगप्रतिकार क्षमता व चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते.

15 टक्‍क्‍यांहून जास्त भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता असते. त्यापैकी बहुसंख्य लोक शाकाहारी असतात. 50 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वयाच्या व्यक्‍ती सेलीयाकग्रस्त असतात किंवा त्यांना इतर पचनविषयक समस्या असतात. त्यामुळे जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता बळावण्याची शक्‍यता जास्त असते.

जाणून घ्या, जीवनसत्त्व बी 12 चे प्रमाण मायक्रोग्राममध्ये :
– अर्भक ते वय 6 महिने : 0.4 एमसीजी
– शिशू वय 7-12 महिने : 0.5 एमसीजी
– बालके वय वर्ष 1-3 : 0.9 एमसीजी
– बालके वय वर्ष 4-8 : 1.2 एमसीजी
– बालके वय वर्ष 9-13 : 1.8 एमसीजी
– किशोरवयीन वय वर्ष 14-18 : 2.4 एमसीजी
– गर्भवती असल्यास प्रत्येक दिवशी 2.6 एमसीजी
– बाळाला स्तनपान देत असल्यास प्रत्येक दिवशी 2.8 एमसीजी
– प्रौढ (18 आणि त्यावरील) : 2.6 एमसीजी
– प्रौढ गर्भवती असल्यास प्रत्येक दिवशी 2.6 एमसीजी
– बाळाला स्तनपान देत असल्यास प्रत्येक दिवशी 2.8 एमसीजी.