TOD Marathi

Dhaka येथे झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू ; Gas Cylinder चा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज

टिओडी मराठी, ढाका, दि. 29 जून 2021 – बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्‍यामध्ये आज झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ढाक्‍यातील मोघबझार या भागात हा स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ इमारती आणि ३ प्रवासी बसचे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत या स्फोटामध्ये सात 7 जणांचा मृत्यू झाला आहे, असे ढाक्‍याचे पोलिस आयुक्त शफीक इस्लाम यांनी सांगितले आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक चौकशी करत आहे. नेमकं स्फोट मागील कारण काय आहे? आदी प्रश्नांची उकल होणं बाकी आहे.

गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे हा स्फोट घडला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर अधिक सविस्तर माहिती दिली जाणार आहे, असे अग्निशमन दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल सज्जाद हुसेन यांनी सांगितले आहे.

घटनास्थळाच्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे? आणि किती प्रमाणात नुकसान झालं आहे?, याचा अंदाज अदयाप प्रशासनाला आलेला नाही.